॥ जय माऊली जय माऊली जय पुंडलिक माऊली ॥


या  माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इंटरनेटने एक फार मॊठी भुमिका साकारली
आहे.या इंटरनेटला माहितीचा भांडार म्हणतात.तसेच आता हे एक आता महत्वाचे
क्षेत्र मानले जाते. त्यामुळे या महत्वाच्या क्षेत्रामध्ये श्री पुंडलिक
महाराज संस्थान मागे राहून कसे चालेल.

श्री पुंडलिक महाराजांबद्दल पुर्ण माहिती मिळावी ह्या संकेतस्थळाचा(वेबसाईटचा)
मुख्य उद्देश ! सर्वप्रथम हे संकेतस्थळ मराठीमध्ये भक्तांसमोर सादर
करतांना आम्हाला फार आनंद होत आहे. भक्तहो,हे संकेतस्थळ पुर्णपणे
संस्थानचे असून,हे संकेतस्थळ श्री पुंडलिक महाराज यांना अर्पण आहे. हे
संकेतस्थळ तयार करण्यासाठी ज्या भक्तांनी आम्हाला मदत केली त्यांचे आम्ही
सदैव आभारी राहू.
या संकेतस्थळावर श्री पुडंलिक बाबां बद्दल माहीती
देण्यात आलेली आहे.या आवृत्त्तीतील माहीती पुर्णपणे अचूक व परिपूर्ण
असण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. पण तरीही या लिखाणातील चूका म्हणा
किंवा व्याकरणातील चुका म्हणा त्या काही प्रमाणात असू शकतात,जर अशा काही
चुका आपणास आढळल्या तर त्या कृपया आमच्या लक्षात आणून द्या. या याशिवाय
आपल्या काही सुधारात्मक सुचना असतील तर त्याचे नेहमी स्वागत करण्यात येईल.
     
श्री पुंडलिकमहाराजांची माहीती उपलब्ध करुण बाबांच्या भक्ताची जास्तीत जास्त सोय करून
देण्याच्या उद्देशाने प्रथम टप्यामध्ये ही मराठी भाषेत वेबसाईट आपणास
उपलब्ध करून देतांना आम्हाला निश्चितच आनंद होत आहे. या साईटद्वारे
पुंडलिक महाराजांचे भक्त जगात कुठेही दूर अंतरावर असूनसुध्दा,तेथुनच
त्यांना पुंडलिक महाराज भेटीचा प्रत्यय,अनुभव व आंनद लाभेल.जय पुंडलिक
माऊली..............