॥ जय माऊली जय माऊली जय पुंडलिक माऊली ॥
संस्थान विषयी 
                 निसर्ग रम्य,शांत वातावरणात पुंडलिक नगरची १९७२ साली स्थापना झाली.माऊली भक्तांच्या योगदानातून श्री पुंडलिक महाराज संस्थानच्या विकासाची वाटचाल सुरू झाली.

                         प्रवेशव्दार,दुर्गादेवी मंदिर,श्री महादेवाचे मंदिर,श्री हनुमान मंदिर,ब्र.खंडूनाणा मंदिर,दत्त मंदिर,भक्त निवास,श्री समाधी स्थळापर्यंत डांबरीकरण मार्ग अशा अनेक उपलब्धीची नोंद करता येईल.त्याच प्रमाणे पुडंलिक जीवन दर्शन,पुंडलिका भेटी,पुंडलिक स्तवराज श्री पुंडलिक बाबांचा जीवन प्रकाश असे ग्रंथ,परमहंस मासिक,अनेक काव्य पुस्तके प्रकाशीत करून संस्थानने भक्ताकरीता
श्री बाबांचे वाड्‍:मय भंडार उपलब्ध करून दिले.संस्थानच्या कार्यप्रवासातील एक महत्वाचा मोलाचा प्रसंग श्री परमहंस  पुंडलिक बाबांच्या भव्य दिव्य मूर्तीची प्राण प्रतिष्ठा चैत्र शु.पंचमी दि.२ एप्रिल २००६ श्री परमहंस पुंडलिक बाबांचा जन्मदिन या   दिवशी झाली.मंदिरावरील कळस व संपुर्ण मंदिराचे बांधकाम पुर्ण होण्याच्या मार्गाने वेगाने वाटचाल सुरू आहे.
                  
  सर्वानुमते श्री पुंडलिक महाराज संस्थान,पुंडलिकनगर(मुर्तिजापुर) ट्रस्ट्चे अध्यक्ष म्हणुन श्री विठ्ठलराव पातोंड व      व्यवस्थापक म्हणुन श्री विवेकराव पातोंड सेवाभावाने पाहात असतात.

  तसेच श्री बाबांचे भक्त कवी श्री अजाबदास सरदार हे पुंडलिकनगरमध्ये आधिक काळ राहुन संस्थानच्या कार्यात सेवाबुध्दीने   झटतांना दिसून येतात.श्री पाडुरंग सरदार अत्यंतनिष्ठेने पुजाअर्चा करीत असतात,त्यांची आदर्श दिनचर्या गौरवास्पद आहे.

श्री पुंडलिक बाबा समाधी मंदीर बांधकाम समिती  
पदधिकारी 

अध्यक्ष,श्री विठ्ठल खंडुजी पातॊंड,पुंडलिक नगर 
व्यवस्थापक,श्री विवेक नारायणराव पातोंड,पुंडलिक नगर

उपाध्यक्ष,श्री भैयासाहेब उर्फ विवेक नवनितलाल चंदनकर 
उपाध्यक्ष,श्री विश्वनाथरावजी मुळे,रोहणा,ता.मुर्तिजापूर
सचिव,श्री पंजाबराव भाऊराव देशमुख,पुंडलिक नगर 
सहसचिव,श्री बाबा बाळकृष्ण धांडे,कारंजा 
कोषाध्यक्ष,श्री पुंडलिकराव नारायणराव सरोदे,मुर्तिजापूर 
उपकोषाध्यक्ष,श्री जगन्नाथराव नामदेवराव ठोकळ,रेपारखेड 
सदस्य,श्री पां.झी.होले,दर्यापूर 
सदस्य,श्री के.एन.गणेश गुरूजी,मुर्तिजापूर 
सदस्य,श्री श्रीकॄष्ण लक्ष्मण कळंब,बाभूळगांव(जहागीर) 
सदस्य,श्रीमती गीताबाई किसनराव गुल्हाने,पुंडलिक नगर 
आर्किटेक,श्री संजीव राऊत,अकोला-नागपूर
श्री परमहंस पुंडलिक बाबावरील प्रकाशने
पुडंलिक जीवन दर्शन
पुंडलिका भेटी-कुमार श्री संजय वाघ(कोल्हापूर)
पुंडलिक स्तवराज-श्री बाबासाहेब धांडे(अमरवती)
श्री पुंडलिक बाबांचा जीवन प्रकाश ग्रंथ
परमहंस मासिक
श्री परमहंस पुंडलिक बाबा स्तोत्र-र.वि.देशपांडे
अनेक काव्य पुस्तके प्रकाशीत होत आहेत.