॥ जय माऊली जय माऊली जय पुंडलिक माऊली ॥
प्रस्तावना
विदर्भाला संतभूमी म्हणतात.या मातीत अनेक   विदर्भाला संतभूमी म्हणतात. या मातीत अनेक लिला धारण करणारे अनेक संत झाले.त्यांच्या पुण्य प्रसादाची महिमा आजही उत्तरोत्तर वाढविणारी संत मंडळी हा प्रदेश जीवीतोध्दारासाठी जागवित आहे.काही संत जीवांचे भान ठेवून भक्तीचा आस्वाद घेतात त्यांना कर्मयोगी महात्मे असे म्हणतात.काही संत प्रारब्धाने ब्रम्हसुखात तन्मय होऊन,                                                      
          देव पहायला गेले । ते देवचि होऊन गेले ॥
                 असा महान साक्षात्कार दाखवितात.त्यांना परमहंस म्हणतात.या थोरल्या स्थितीत द्दषान होण्याचे थोर ज्या सत्पुरूषांना लाभले त्या संतमालेचे अमोलिक रत्न परमहंस पुडलिक बाबा होत.
                 अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर जवळील गोरेगांव या छोट्याशाखेडेगांवी काटेपूर्णा नदी तीरावर साध्याभोळ्याभक्तीमार्गी धनगर समाजातील श्री खंडूजीनाना व सौ.मंजुळाबाई या पातोंड (दि.१० एप्रिल १९३२) रोजी पूज्य श्री बाबांचा जन्म झाला.संत गाडगेबाबांचे अनुयायित्व लाभलेले खंडूजीनाना त्यावेळी गावातील    ’श्री भक्त पुंडलिक’ या नावाच्या नाट्यप्रयोगात काम करीत असतांना मंचावरच त्यांना एका तेजस्वी महापुरुषाचे दर्शन घडले.’आपणाप्रमाणेच का तेजस्वी बाळाने तुमच्या घरी जन्म घॆतला आहे’ अशी साषात्कारी वाणी येकू आली.तेव्हा खंडूजीनाना त्वरीत गडबडीने घरी येऊन पाहताच त्यांना याची सत्यता पटली.
                 पूज्य श्री बाबांचे विलशण अवतारी विभूतीमत्व अगदी जन्मापासूनच विविध घटनांतून दिसू लागले होते.ते सदैव शांत,गंभीर मुद्रेने आपल्या तंद्रित खेळत बागडत.रडताना त्याना कधीही कोणीही नाही.वयाची सहा वर्ष उलटली तरीही मुखातून एकही अक्शर न काढता मुकेपणेच खाणाखुणा करीत त्यांचे संभाषण चाले.त्याच दरम्यान दर्यापुर पिंपळोद ऎथील दिव्य शरीरकांतीचे महानयोगी परमहंस श्री परशरामबाबा अचानकपणे गोरेगावी आले.’मन्या,मन्या’ म्हणत बाळ पुंडलिकास अतीव प्रमाने जवळ घेऊन त्यांनी त्यांच्याशी काही गुढ संवाद केला. अगम्य अशा या भेटीनंतर अगदी प्रथमत: बाल पुंडलिक ’गोविंद राधे गोविंद’ असे मंजूळ शब्द उच्चारु लागले. एकदा कुरणखेडचे श्री गोविंदसाधू गोरेगवी आले. बाल पुंडलिकची मुर्ती पाहुन अत्यंत हर्षाने त्यांनी त्यास आईवडीलांच्या संमतीने आपल्या गावी आणले. तेथे यशवंत माळीचा पाच वर्षांचा मृत बालक जिवंत करणे , दिव्यातील तेल संपताच पाणी ओतुनही दिवा तेवत ठेवणे अशा अदभूत लीला बाळ पुंडलिकाने दाखविल्या. नंतर कुटासा येथेही काही काळ रमले. तेथील विस्तीर्ण जलाशयात ते तासनतास बसत असत. त्यांचे खाणे-पिणे निजणे-उठणे सर्व काही अतर्क्य असे.काही जण श्रदेने त्यांची पूजा करुन पाहत तर काही जण त्यानां मारझोड करुन त्रासही देत असत. एकदा एका व्यापाय्राने चक्क मिरच्यांच्या पोत्यामध्ये त्यांना रात्रभर बांधून ठेवले. पण त्यांचावर काहीच परिणाम झाला नाही.त्यांचे विदेहीपण सुरु राहीले. पूज्य बाबांच्या काही अद्दभूत गोष्टी ऎकल्या तरीही लौकिक व्यवहारी जगाच्या द्ष्टीने त्यांचे एकंदर विचित्र वागणे-बोलणे पाहून श्री खंडूजीनाना व सौ.मंजुळाबाई फारच चिंताग्रस्त असत. त्यावेळी धामणगाव(देव) येथील महान सत्पुरुष श्री मुंगसाजी महाराजांची सर्वत्र फारच ख्याती पसरली होती.एका द्ष्टांतानुसार खंडुजीनाना बाळ पुंडलिकास त्यांच्याकडे घेऊन गेले.तेथे जाताच बाळ पुंडलिक मुंगसाजी महराजांच्या शेजारी त्यांच्या गादीवर जाऊन बसले.खंडुजीनाना भितीने मुंगसाजी महराजांना हात जोडून,’बाळ पुंडलिक वेडा आहे,त्यावर कृपा करा’असे सांगू लागले.तेव्हा मुंगसाजी महाराज हसत हसत म्हणाले.’धनगराला रत्न गवसले’.काय पारख त्याला? अरे हे अमुल्य रत्न आहे. हे केवळ माझेच स्वरूप आहे.याचे जतन कर’.नंतर मुंगसाजी महाराजांनी आपले परमभक्त यशवंतराव राजे घाटगे बडोदेकर सरकार यांच्या हातून बाल पुंडलिकास अभ्यंग स्नान घालून नवीन कफनी परीधान करून त्यांचा अधिकार सर्वांना सांगून दिला.यानंतर गोरेगांवी १९४८ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी पुंडलिकबाबांचा भव्य जयंती यात्रा महोत्सव चैत्र शुध्द पंचमीस साजरा झाला व तीच परंपरा आजही सुरू आहे.गोरेगावचे आडवळणाचे वास्तव सोडून सन १९७२ पासून मुर्तिजापूरच्या पुंडलिक नगरीत बाबा राहू लागले.
                    पुज्य बाबांच्या जीवनामधील अनेक चमत्कारीक घटना अनुभवून सर्व स्तरातील स्त्री-पुरूष पुर्ण श्रध्देने त्यांच्या चरणी समर्पित होत असत. आधीच पूर्वसंकेत दिल्यानुसार पुज्य बाबांनी भाद्रपद वद्य दशमी दिनांक ९ ऑक्टोबर १९८५ रोजी देह विसर्जन केले.पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत मुर्तिजापूरच्या पुंडलिकनगरामध्ये त्यांनी समाधी घेतली.