थोर संताचे बाबाविषयी धन्योदगार्‌
 श्री पुडंलिक बाबा हे अमुल्य रत्न आहे,यांचे जतन कर,हे माझे केवळ स्वरुपच आहे.
     ---श्री मुंगसाजी महाराज,धामणगांव(देव)

अरे हा देवच आहे.त्याच्या केवळ दर्शनाने जिवाचे कल्याण होते.
     ---संत गाडगे महाराज

श्री पुडंलिक महाराज अवतारी पुरूष असून माझे आराध्यदैवत आहेत.
     ---श्री संत विक्तबाबा टाकरघाट(नागपुर)

श्री पुडंलिक बाबा संतामधले युवराज आहेत.
    ---श्री संत लहानुजी महाराज,टाकरखेड

श्री पुडंलिक बाबा रामाचे अवतार आहेत,केवळ रामच आहेत.
     ---श्री संत गुलाबबाबा काटेल,कोलद

हा पुंडलिक मोठा खेळ खेळ्या आहे.हा लिलामय मोठ्या लिला करणारा आहे.
         ---श्री बद्रीनाथ महारज,मुर्तिजापुर

श्री पुडंलिक बाबा ही दर्शनीय मुर्ती आहे.
       --श्री मारोती बाबा,सालबर्डी

श्री पुडंलिक बाबा साधारण संत नाहीत जन्मोजन्माचे तपश्चैयेने अशी स्थिती प्राप्त
होत असते.असे संत अढळपदी असतात मानवाचे कल्याणासाठी ते स्वेच्छेने
मॄत्युलोकात अवतार घेतात.त्याचे कार्य अक्षम्य व अत असते.
        --श्री संत सितारामदास महाराज

श्री पुडंलिक बाबा माझा आत्मा आहे.
     ---श्री संत परशराम बाबा,पिंपळोद

श्री पुडंलिक बाबा संतश्रेष्ठ साक्षातकारी विभूती होय.
        ---श्री संत अच्युत महाराज,कौडण्यपूर

देव पहावयाचा असेल तर श्री पुडंलिक बाबा कडे जा ते साक्षात देवच आहे.
               ---श्री संत देवमन महाराज,लोधीखेड

परमहंस स्थितीत रममान असलेले श्री पुंडलिक बाबा यांचा अधिकार फार मोठा आहे.
 -श्री नाना महाराज तरानेकर(इंदोर)